हाती तिरंगा...

हाती तिरंगा, कपाळी जय माता दी ची चुनरी; वारंवार पाहिला जातोय सीमा हैदरचा नवा ड्रामा

सीमा हैदरनं अनेकांच्या नजरा वळवल्या

पाकिस्तानातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या सीमा हैदरनं अनेकांच्या नजरा वळवल्या. आपल्या चार मुलांसह भारतात आलेली ही सीमा आता नवा ड्रामा करताना दिसत आहे.

'जय माता दी'

कारण, सध्या सीमाच्या हाती आता चक्क तिरंगा दिसत असून, तिनं तशाच पद्धतीची साडीही नेसल्याचं पाहायला मिळत आहे. कपाळी 'जय माता दी' असं लिहिलेली चुनरी दिसत आहे.

'हर घर तिरंगा'

'हर घर तिरंगा' मोहिमेला दाद देत सीमा आणि सचिननं त्यांच्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आहे.

फोटो व्हायरल

घरच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठीही सीमानं चांगलीच तयारी केल्याचं व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये पाहायला मिळतंय.

'हिंदुस्तान जिंदाबाद'

मी आता माझ्या घरावर तिरंगा ध्वज लावला आहे आणि आता मी भारतीय आहे. मी वारंवार म्हणेन, 'हिंदुस्तान जिंदाबाद' असं तिनं सर्वांनाच सांगितलं.

पंतप्रधानांचे आभार

बरं ती इतक्यावरच थांबली नाही, तर तिनं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या नावानंही तिनं जयघोष केला.

सीमा हैदर

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं सीमा हैदरही या रंगात रंगली असून, तिनं संधी मिळाल्यास 'गदर 2' हा चित्रपट पाहायला जाऊ असंही म्हटलं.

VIEW ALL

Read Next Story