आपण आपल्या पतीच्या मनावर अधिराज्य गाजवावं, सासरच्यांचं मन जिंकावं असं प्रत्येक महिलेला वाटतं.
मात्र काही ठराविक मूलांक असलेल्या महिला पतीबरोबरच आपल्या सासूच्या मानवरही राज्य करतात.
अंकशास्त्रानुसार ज्या मुलांचा मूलांक 3 असतो त्यांचा स्वामी ग्रह गुरु असतो.
ज्यांचा जन्म महिन्यातील 3, 12, 21, 30 तारखेला असतो त्यांचा मूलांक 3 आहे असं मानलं जातं.
3 मूलांक असलेल्या महिला आपल्या सरळ स्वभाव आणि जन्मजात गुणांमुळे केवळ पतीचं नाही तर सासूचंही मन जिंकून घेतात.
मूलांक 3 असलेल्या महिला हा हसऱ्या स्वभावाच्या असतात आणि त्यांना वादविवादापासून दूर राहायला आवडतं.
वाद न आवडण्याच्या सवयीमुळेच मूलांक 3 असलेल्या महिला या त्यांच्या सासूच्या लाडक्या असतात, असं म्हटलं जातं.
मूलांक 3 असलेल्या महिलांकडे सर्वांना समाधानी ठेवायची आणि घरातील वातावरण हसत खेळतं ठेवायची कला असते. अशा महिलांच्या आजूबाजूला कोणीच उदास नसतं.
मूलांक 3 असलेल्या मुलींचं वैवाहिक आयुष्यही समाधानाचं असतं कारण त्या पतीबरोबरच सासरच्या लोकांचीही काळजी घेतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)