पैसा, करिअरमध्ये प्रगती, प्रेमात यश...! मग आठवड्यातील वारानुसार घाला 'या' रंगाचे कपडे
वेद शास्त्रानुसार विशिष्ट रंगाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो.
सात रंग हे ग्रहांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पैसा, करिअरमध्ये प्रगती, प्रेमात यश हवं असेल तर आठवड्यातील वाराला कोणते कपडे परिधान करायचे पाहा.
सोमवार हा चंद्र ग्रहाशी संबंध असल्याने मन आणि भावनांसंबंधित यादिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. आत्मविश्वास, धैर्य वाढ आणि अचडणीचा सामना करण्यासाठी यादिवशी लाल रंगाचे कपडे घातले पाहिजे.
बुधवार हा बुध ग्रहाशी निगडित असून वाणी, बुद्धिमत्ता आणि संवादासाठी यादिवशी हिरव्या रंगाचे कपडे घातले पाहिजे.
गुरुवार हा दिवस गुरु ग्रहाशी जोडला गेलाय. ज्ञान आणि समृद्धीसाठी यादिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे.
शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. आर्थिक प्रगतीसाठी यादिवशी लाल, पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता.
शनिवार हा शनिदेवाचा वार आहे. न्याय आणि समतोल राखण्यासाठी गडद रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता.
रविवार हा सूर्यदेवाशी संबंधित आहे. आयुष्यात यश आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी यादिवशी लाल रंगाचे कपडे घातले पाहिजे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)