Fridge आठवड्यातून किती वेळा बंद करावा?
प्रत्येक घरात फ्रिज हा एक अविभाज्य अंग आहे.
हिवाळा असो किंवा उन्हाळा फ्रिज हा उपयुक्त ठरतो.
फ्रिजचा योग्यरित्या वापर न केल्यास तो खराब होण्याची भीती असते.
काही लोक आठवड्यातून एक ते दोन दिवस त्यांचे रेफ्रिजरेटर काही तासांसाठी बंद करतात.
लोकांना वाटते की असे केल्याने त्यांचा फ्रीज खराब होण्यापासून वाचेल.
तर तज्ज्ञ सांगतात की, फ्रिज हा तुम्हाला बंद करायची गरज नाही.
फ्रिजमध्ये ऑटो कट ऑफ फीचर आहे, ज्यामुळे फ्रिज आपोआप बंद होतो.
दिवसातून एकदा नाही तर दिवसातून डझनभर वेळा फ्रिज हा बंद होत असतो.
त्यामुळे फ्रिज हा केवळ साफसफाईच्या वेळी किंवा कोणतीही दुरुस्ती करतानाच बंद करावा. इतर वेळी तो बंद करण्याची गरज नाही.