हळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?
हळद- कुंकू लावण्याचाही क्रम आहे. कुंकू कपाळाच्या मध्यभागी लावलं जातं. असं करताना कुंकवाचं बोट कपाळी दाबलं जातं. हा शरीराचा तोच बिंदू असतो ज्यामुळं रक्तपुरवठा सुरळीत होऊन स्नायूंचा ताण कमी होतो.
असं म्हणतात की कुंकू लावल्यामुळं शरीरात नकारात्मक शक्तींचा शिरकाव न होता त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण होतो.
कोणा दुसऱ्या व्यक्तीला हळद लावतान अनामिका आणि कुंकू लावताना मध्यमेचा वापर करण्याचा सल्ला शास्त्रानुसार दिला जातो. पुरुष असो वा महिला, दुसर्यांना कुंकू लावताना मध्यमेचाच वापर करणं फायद्याचं.
दुसर्या व्यक्तीला हळद कुंकू लावताना त्यांना स्पर्श केला जातो. अशा वेळी त्यांच्यातील वाईट शक्तींचा संचार आपल्या शरीरात स्पर्शाच्या माध्यमातून होण्याची शक्यता असते. मध्यमेत (मधल्या बोटामध्ये) ते थोपवून धरण्याचं बळ असतं.
सकाळच्या वेळी अंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावणं फायद्याचं. असं केल्यामुळं शरीरात कुंकवाची ताकद संचारते असं सांगितलं जातं.
थोडक्यात हळद- कुंकू लावताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्याचा सकारात्मक फायदाच होतो. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)