बाप्पाला घरी आणताना चेहरा का झाकतात?
मंगळवारी 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून त्यादिवशी बाप्पाचं आगमन होणार आहे. बाप्पाला घरी आणताना त्यांचा चेहरा हा झाकला जातो.
खरं तर काही जण बाप्पाचा चेहरा झाकता तर काही जण नाही. या आहे यामागील शास्त्र त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
तसं पाहिलं तर ही हे कुठलं शास्त्र किंवा प्रथा नाही. कोणीतरी सांगितलं आणि ही प्रथा सुरु झाली.
मोरेश्वर घैसार गुरुजींनी सांगितलं की, मूर्ती खूप सुंदर असते त्यामुळे तिच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये म्हणून बाप्पाचा चेहरा झाकला जातो.
ते असं ही म्हणाले की, मूर्ती घरी आणताना तिचा चेहरा आपल्याकडे असावा तर विसर्जन करताना बाप्पाचा चेहरा रस्त्याकडे असावा.
त्याशिवाय गणपतीला घरी आणताना यजमानाने डोक्यावर टोपी घालावी. हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)