लांडोर आणि मोर कधी शारिरीक संबंध ठेवत नाहीत. लांडोर मोराचे अश्रू पिऊन गर्भवती होते, असे तुम्ही ऐकले असेल.
मोर ब्रम्हचार्याचे पालन करतो म्हणून श्रीकृष्णाच्या मुकूटावर असतो, असेही सांगितले जाते.
आता तुमच्या मनात प्रश्न असेल की खरचं मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होत असेल का? चला जाणून घेऊया.
मोर आणि लांडोर देखील इतर पशु पक्षांप्रमाणेच पिल्लांना जन्म देतात.
पावसाळ्यात किंवा प्रजनन काळात मोर आपला पिसारा फूलवून लांडोरला आकर्षित करतो.
जेव्हा लांडोर आकर्षित होते तेव्हा दोघांमध्ये संबंध होतात. यानंतर लांडोर इतर पक्षांप्रमाणेच गर्भवती होते.
मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते, अशा अफवा समोर येतात. पण वैज्ञानिकांनी हा दावा फेटाळला आहे.
मोरसहित सर्व पक्षी संबंध ठेवतात. मोर लांडोरच्या पाठीवर बसलेला दिसतो. यावेळी आपले स्पर्म लांडोरच्या शरिरात ट्रान्स्फर करतो.
प्रत्येकवेळी पक्षांच्या संभोगाला 15 सेकंदांचा वेळ लागतो. यावेळी नर आणि मादा एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात.