गणेश चतुर्थीच्या दिवशी आवर्जुन करा 'या' गोष्टी, घरात नांदेल सुख शांती

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला घराघरात बाप्पाचे आगमन होते. यावेळी आपण मनोभावे बाप्पाची पूजा करतो.

गणपती बाप्पाच्या आगमनाने आपल्या घरी आनंद, उत्साह येतो. दरम्यान तुम्ही विधीवत गणेशाची पूजा केलात तर तुमच्या घरात कायमची सुख, शांती नांदेल असे पुराणात सांगितले आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात विधीनुसार बसवावे आणि या दिशेला तोंड करून पूजा करावी.

गणपतीला लाल रंग खूप आवडतो. म्हणून गणेश चतुर्थीला लाल रंगाचे कपडे घालून पूजा करा. गणपतीच्या पूजेमध्ये लाल रंगाची फुले, फळे आणि लाल चंदनाचा वापर करा.

जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि इच्छित वरदान मिळवण्यासाठी गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करणे आवश्यक आहे.

गणेश चतुर्थीला तुम्ही घरी गणपती बसवत असाल तर त्याची पूजा आणि आरती वेळेवर करा. तसेच दिवसातून तीन वेळा गणपतीला अन्नदान करावे.

बाप्पाच्या मुर्ती असताना घर बंद ठेवून जाऊ नका. गणेशाची पूजा करताना सकारात्मक विचार मनात आणा.

गणपतीच्या पूजेचे लवकर फळ मिळवण्यासाठी त्याच्या आवडीचे मोदक आणि मोतीचूर लाडू आणि केळीचे फळ अर्पण करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story