शास्त्रामध्ये ब्रह्म मुहूर्त हा दिवसाचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या वेळेत वातावरणात सकारात्मक ऊर्जा जास्त असते.
चला जाणून घेऊयात नवीन वर्ष 2025 चा पहिला ब्रह्म मुहूर्त सकाळी किती वाजता येईल.
1 जानेवारी 2025 रोजी ब्रह्म मुहूर्ताची वेळ सकाळी 05:25 ते 06:19 पर्यंत असणार आहे.
वर्षाच्या पहिल्या ब्रह्म मुहूर्तावर दोन विशेष उपाय केल्यास वर्षातील 365 दिवस लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहिल.
पहिला उपाय - ब्रह्म मुहूर्तावर आपले तळ हात पाहत ओम कराग्रे वसते लक्ष्मी कर्मधे सरस्वती करमुले: तू गोविंदा: प्रभाते कर दर्शनम' या मंत्राचा जप करा.
अशी मान्यता आहे की, मानवाच्या तळहातावर ग्रह देवगेवता वास करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून सर्व देवी देवतांचं दर्शन घडतं.
ब्रह्म मुहूर्तावर उठा, आंघोळ करा आणि आरामदायी मुद्रेत बसा. त्यानंतर डोळे बंद करुन एखाद्या दिव्य आणि लाभदायक मंत्राचा जप करा.
'ओम ब्रह्मा मुरारी पुराणकारी भानु शशिन भूमिस्तुतो बुधश्च गुरुश्च, शुक्र, शनि, राहू. केत्व कुरुवंतु सर्वे मर्मे सुभप्रातम् ओं' या मंत्राचा जप करा.
ब्रह्म मुहूर्तावर या मंत्राचा जप केल्यास देवी देवता प्रसन्न होतात. असं करणाऱ्यांच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)