मराठी चित्रपटसृष्टी नेहमीच अर्थपूर्ण आणि बोधपर चित्रपट वेळोवेळी प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणपद्घती या विषयांना अनुसरुन बरेच मराठी चित्रपट गाजले तर काही लोकांपर्यंत पोहचलेच नाहीत. अशाच काही चित्रपटांबद्दल आज म्हणजेच 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त जाणून घेऊयात...
2009 साली हा चित्रपट रसिकांच्या भेटीस आला. अशोक सराफ,मकरंद अनासपुरे,निर्मिती सावंत,दीलीप प्रभावळकर,मोहन आगाशे असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्थेची स्थिती मार्मिकपणे मांडली आहे. हा चित्रपट मूळ विनोदी असला तरी नाजुक विषय उत्तमरित्या हाताळण्यात आला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याची कुवत वेगळी असते,एकासारखा दूसरा नसतो आणि दूसऱ्यासारखा तिसरा नसतो! हाच संदेश देणारा पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आणि शिक्षण व्यवस्थेच्या दबावाखाली चिरडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याची कथा म्हणजे 'शिक्षणाच्या आईचा घो' हा चित्रपट. मध्यमवर्गीय पालक पाल्याला शिक्षण देण्यासाठी किती कष्ट करतात या विषयावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात भरत जाधव वडीलांच्या भूमिकेत आहे. 2010 साली चित्रपट प्रदर्शित झाला होता.
2002 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबद्दल फार कमी दर्शकांना ठाऊक आहे. चित्रपटात अतुल कुलकर्णी, ज्योती सुभाष, मिलंद गुणाजी आदी कलाकार आहेत. एक शिक्षक विद्यार्थ्याचे वाया जाणारे आयुष्य कसे पालटू शकतो हे या चित्रपटात पहायला मिळते. अतूल कुलकर्णीची भूमिका खरा शिक्षक कसा असायला हवा हे दर्शवणारी आहे.
2014 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अमृता सुभाष ,श्रीकांत यादव, पार्थ भालेराव, अर्चित देवधर आदी कलाकारांनी काम केले आहे. पालक गमवण्याचा आणि पालकांच्या बदलीचा शाळकरी मुलांच्या आयुष्यावर किती आणि कसा परीणाम होतो, हे फार चांगल्या पद्घतीत मांडलेले दिसून येते . शाळकरी मुलांच्या मैत्रीची हा कथा आहे.
हा चित्रपट मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' या कादंबरीवर आधारित आहे. प्रमुख भूमिकेत अंशूमन जोशी आणि केतकी माटेगावकर आहेत. 2012 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात पौगंडावस्थेतील किशोरवयीन मुलांच्या भावना फार छान प्रकारे मांडल्या आहेत. शालेय जीवनात एका वयानंतर होणारे आकर्षण आणि त्यासाठी मुलांनी घेतलेले कष्ट चित्रपटात बघायला मिळतात.