'एक्सपायरी', 'बेस्ट बिफोर' आणि 'यूझ बाय डेट' यामध्ये फरक काय?

खाण्याचे पदार्थ किंवा कोणत्या इतर प्रोडक्ट्सवर अनेकदा एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

प्रत्येकाला एक्सपायरी डेट म्हणजे काय? माहित आहे पण अनेकांना बेस्ट बिफोर किंवा युझ बायचा अर्थ कळत नाही.

तुम्हाला देखील यामध्ये गोंधळ असेल तर या तिन्ही शब्दांचे अर्थ समजून घ्या.

सामान्यपणे लोकं या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच असल्याचं समजतात. पण या तिन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे.

एक्सपायरी डेट ही ती तारीख आहे ज्यानंतर त्या वस्तूचा वापर करणे घातक ठरते.

सामान्यपणे खाण्याच्या किंवा औषधांवर एक्सपायरी डेट लिहिली जाते. जे जवळपास 2-3 वर्षांनी संपते.

बेस्ट बिफोरचा अर्थ असा नाही की, त्या तारखेनंतर हा पदार्थ खराब होईल. पण त्या पदार्थाची चव आणि क्वालिटीमध्ये फरक जाणवतो.

या तारखेनंतरही प्रोडक्ट सुरक्षित असते पण त्याची क्वालिटी थोडी खालावलेली असते.

'युझ बाय डेट' म्हणजे या तारखेपर्यंत तो पदार्थ वापरला जाऊ शकता. यानंतर त्याचा वापर करणे सुरक्षित नाही.

हे पण 'एक्सपायरी डेट' प्रमाणेच आहे. सामान्यपणे खाण्याच्या पदार्थावर ही 'एक्सपायरी डेट' ऐवजी 'युझ बाय डेट' असं म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story