चंद्रगुप्ताला सम्राट बनवणाऱ्या आचार्य चाणक्याचे धोरण जीवनात अत्यंत लाभदायक आहेत
आचार्य चाणक्यांची रणनीती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करते, मग ती नोकरी असो वा व्यवसाय, आचार्य चाणक्य यांची रणनीती प्रत्येक परिस्थितीत मार्ग दाखवते
आचार्य चाणक्यांनी कोणावर प्रेम करावे आणि कोणत्या व्यक्तींपासून सावध राहावे हे सांगितले आहे
चाणक्यांच्या मते नेहमी बरोबरीच्या व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे आणि अशा प्रकरणांमध्ये सावध राहिले पाहिजे
चाणक्यांच्या मते माणसाने समान प्रेम केले पाहिजे. कारण प्रेमात असमानता असेल तर भांडणे होतात.
चाणक्य म्हणतात की, असमानता कधीही लपत नाही आणि असमानतेमुळे भांडणे होतात आणि नाती तुटतात
चाणक्य म्हणतात की, ज्याच्याकडे धैर्य आहे अशा व्यक्तीवर प्रेम करा. कारण धैर्यवान व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते.
चाणक्य म्हणतात की, रागीट व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका कारण रागाच्या भरात ती व्यक्ती नातं तोडू शकते
चाणक्य म्हणतात की, जो तुमच्याशी आदराने वागतो आणि नात्याला महत्त्व देतो अशा व्यक्तीवर प्रेम करा.