Shani Sade Sati

शनिदेवाची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते?

शनीची साडेसाती

शनीची साडेसाती म्हणजेच 7 वर्षे काही राशींना शनीची तीव्र गती सहन करावी लागते. ज्या राशीत शनी निवास करतो त्या राशीवर शनीची साडेसाती सुरू असते आणि एक राशी पुढे आणि एक राशी मागे हीच स्थिती असते.

शनि दंडकर्ता

साडे सतीच्या वेळी शनि दंडकर्ता होतो. ज्या राशींवर शनी साडेसाती सुरू झाली आहे, त्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.

शनीचा प्रवास

शनीला 12 राशींमधून प्रवास करण्यासाठी 30 वर्षे लागतात, म्हणजेच तो एका राशीत अडीच वर्षे राहतो.

किती वेळा येते साडेसाती?

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शनीची साडेसाती तीन वेळा येते. दर 30 वर्षांनी माणसाला शनीच्या साडेसातीला सामोरे जावे लागते.

साडेसातीचा टप्पा

शनि साडेसाती प्रत्येकी अडीच वर्षांच्या तीन टप्प्यांत विभागली आहे. तिन्ही टप्प्यात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

या समस्यांचा त्रास

शनीच्या साडेसातीच्या पहिल्या चरणात व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. दुसऱ्या टप्प्यात कामाच्या ठिकाणी समस्या आणि कौटुंबिक जीवनावर होतो. तर तिसऱ्या टप्प्यात त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

'या' राशींची सुरु आहे साडेसाती

या वर्षी म्हणजे 2023 मध्ये मकर, कुंभ आणि मीन राशींची साडेसाती सुरु आहे. शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिव आणि हनुमानाची उपासना सर्वोत्तम मानली जाते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story