आचार्य चाणक्य यांना सर्वात महान विचारवंतांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याकडे आजही एक आदर्श मार्गदर्शक म्हणूनही पाहिलं जातं.
चाणक्य यांना अर्थशास्त्रापासून ते समाजशास्त्रपार्यंत अनेक विषयांचं ज्ञान होतं.
चाणक्य यांनी रचलेल्या अनेक नीति आजही आवर्जून फॉलो केल्या जातात. त्यांच्या या नीति आजही अनेकजण मार्गदर्शनासाठी वापरतात.
आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार यशस्वी होण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या लोकांपासून दूर राहिलं पाहिजे हे जाणून घेऊयात...
आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तींबरोबर मैत्री करु नये असं चाणक्य सांगतात. अशा लोकांपासून दूर राहण्याचा ते सल्ला देतात.
वाईट संगत असलेल्या लोकांपासून दूर रहावं. असे लोक आपल्या यशामध्ये अडथळा ठरु शकतात, असं चाणक्य म्हणतात.
मूर्ख लोकांपासून दूर राहिलेलं चांगलं. अशा लोकांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.
सतत नकारात्मक गोष्टी करणाऱ्यांपासून चार हात दूर राहणं फायद्याचं ठरतं, असं चाणक्य म्हणतात. असे लोक स्वत: प्रगती करत नाही आणि इतरांनाही करु देत नाहीत.
कठीण काळात तुमची साथ सोडून जाणाऱ्यांपासून दूर राहणं अधिक हिताचं ठरतं, असं चाणक्यनीति सांगते.