करा गणरायाचे 'हे' 5 उपाय
बुधवार हा गणपतीला समर्पित दिवस आहे. आज गणरायाची भक्ती भावाने पूजा केल्यास घरात सुखी समृद्धी नांदते असं म्हणतात. त्यामुळे बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय.
बुधवारी सूर्योदयापूर्वी 2 मूठभर मूग घेऊन स्वतःवर फिरवा. यानंतर तो मूग वाहत्या पाण्यात अर्पण करा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
मंदिरात जाऊन गणरायाला गूळ किंवा मोदक अर्पण करा. या उपायाने घरात धन-धान्याची कमी भासत नाही.
बुधवारी श्रीगणेशाची पूजा केल्यानंतर एखाद्या किन्नरला काही पैसे दान करा. यानंतर त्याच्याकडून आशीर्वाद म्हणून काही पैसे परत घ्या आणि ते पूजास्थळी ठेवा. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होणार.
बुधवारी मंदिरात जाऊन गणेशाला लाडू आणि दूर्वा अर्पण करणे शुभ मानलं जाते. असे केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो.
बुधवारी श्रीगणेशाच्या माथ्यावरील सिंदूर आपल्या कपाळावर लावा. त्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतात. शिवाय प्रत्येक कामात यश मिळतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)