भाद्रपद पौर्णिमेला 5 दुर्मिळ योग!

धनलाभासाठी करा 'हे' उपाय

भाद्रपद पौर्णिमा 29 सप्टेंबर 2023 ला असणार आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमा तिथीला महत्त्व आहे.

भाद्रपद पौर्णिमेच्या दिवसापासून पितृ पक्ष पंधरवडा सुरु होतो. या दिवसापासून पितरांसाठी पिंड दान, श्राद्ध, तर्पण केलं जातं.

भाद्रपद पौर्णिमेला दुर्मिळ असे योग जुळून आले आहेत. शुभ योग, सर्वार्थ सिद्धी योग, वृद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि ध्रुव योग असणार आहे.

या दिवशी सत्यनारायणाच्या कथेचं पठण केल्यास आर्थिक लाभ होतो, शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

पौर्णिमा तिथीला सर्वार्थ सिद्धी आणि वृद्धी योगात लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक लाभ होतो असं शास्त्रात सांगितलं आहे.

या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मी वास असतो, अशी मान्यता आहे.

भाद्रपद पौर्णिमेला दान केल्यास पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे या दिवशी अन्न, पाणी दान करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story