टोयोटाने नुकतंच भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त 7-सीटर कार Toyota Rumion ला लाँच केलं होतं.

Maruti Ertiga वर आधारित असणाही ही 7 सीटर कार पेट्रोलसह सीएनजी व्हेरियंटमध्येही उपलब्ध आहे.

पण आता कंपनीने Toyota Rumion च्या सीएनजी व्हेरियंटचं बुकिंग काही दिवसांसाठी बंद केलं आहे.

सुझुकी आणि टोयोटामधील करारानुसार, दोन्ही ब्रॅण्ड्स एकमेकांना सहाय्य करत आहेत. त्याच आधारे या एमपीव्हीला लाँच करण्यात आलं होतं.

Toyota Rumion ला कंपनीने मागील ऑगस्ट महिन्यात विक्रीसाठी लाँच केलं होतं. हिची किंमत 10.29 लाखापासून ते 11.24 पर्यंत (एक्स-शोरुम) आहे.

या एमपीव्हीचं सीएनजी मॉडेल फक्त S MT या एका व्हेरियंटमध्ये आहे. ज्याची किंमत 11.42 लाख आहे.

रुमियनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं कंपनीने सांगितलं आहे. पण यामुळे वेटिंग पीरियड वाढला आहे. त्यामुळे तात्पुरत्या काळासाठी बुकिंग बंद करण्यात आलं आहे.

म्हणजेच आगामी काळात पुन्हा एकदा या कारचं बुकिंग सुरु होईल. दरम्यान हीच स्थिती Ertiga CNG ची देखील आहे. तिचाही वेटिंग पीरियड वाढला आहे.

Toyota Rumion ला एकूण 3 व्हेरियंट आणि 6 ट्रिम्समध्ये सादर करण्यात आलं आहे. या कारमध्ये कंपनीने 1.5 लीटर क्षमतेच्या K सीरिज इंजिनचा वापर केला आहे.

नवं नियो ड्राइव्ह आणि ई-सीएनजी तंत्रज्ञान या कारला चांगला मायलेज देण्यात सक्षम बनवतं.

टोयोटाचा दावा आहे की, याचं पेट्रोल व्हर्जन 20.51 किमी प्रतिलीटर आणि सीएनजी व्हेरियंट 26.11 किलो प्रतिकिलो पर्यंतचा मायलेज देतं.

फिचर्स?

Toyota Rumion वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेसह 17.78 cm स्मार्ट प्ले कास्ट टच स्क्रीन ऑडिओ सिस्टम, टोयोटा i-Connect 55 Plus, रिमोट क्लायमेट कंट्रोल, लॉक/अनलॉक, स्मार्टवॉच कंपॅटिबिलिटी, व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

अलर्ट सर्व्हिस कनेक्ट

कारमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास अलर्ट सर्व्हिस कनेक्ट देण्यात आला आहे. याशिवाय ऑटो कोलिजन नोटिफिकेशन, टो अलर्ट, फाइंड माय कार, पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि क्रूझ कंट्रोल यांसारखे फिचर्स उपलब्ध आहेत.

VIEW ALL

Read Next Story