दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि 15 दिवस असतो.
यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबरला सुरू होऊन 14 ऑक्टोबरला संपणार आहे.
या काळात पूर्वजांच्या आठवणीत पिंडदान केले जाते. पण हे करताना काही नियमांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
पितृ पक्ष 15 दिवस चालतो आणि या काळात घरात पुण्यमय वातावरण असावे हे लक्षात ठेवा. पितृ पक्षामध्ये मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहावे.
श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने पितृ पक्षात 15 दिवस केस आणि नखे कापू नयेत. त्यामुळे पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे करून घ्या.
असे मानले जाते की पितृ पक्षादरम्यान, पूर्वज 15 दिवस पक्ष्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यामुळे पितृपक्षात चुकूनही कोणत्याही पक्ष्याला त्रास देऊ नये. यामुळे पितरांना राग येतो.
पितृ पक्षात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. या दरम्यान लग्न ,मुंज, साखरपुडा आणि गृहप्रवेश निषिद्ध मानले जाते. 15 दिवस पितरांची फक्त पूजा आणि सेवा करावी असे म्हणतात.
पितृ पक्षादरम्यान लोकांनी दुधी,काकडी, हरभरा, जिरे आणि मोहरीचे सेवन करू नये, असेही म्हटले जाते. (येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. Zee 24 Taas याची पुष्टी करत नाही)