हिंदू धर्मात देऊळ तसेच मंदिरात जाण्याला विशेष महत्त्व आहे. दररोज मंदिरात जाणे अनेकांना आवडते. आज आषाढी एकादशी आहे. आज अनेक भक्त आणि वारकरी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातात.
काहींचा मंदिरात जाणे हा देखील दिनचर्येचा एक भाग आहे. रोज मंदिरात जाण्याची सवय लावल्याने अनेक फायदे आहेत.
तुम्ही मंदिरात जात असाल तर तुमचे मन्न प्रसन्न राहते. दररोज मंदिरात गेल्याने माणसाचे मन अध्यात्माकडे आकर्षित होते. माणसाच्या चुकीच्या कामांपासून तुम्ही दूर जाता. या सर्व कारणांमुळे माणसाला रोज मंदिरात जाऊन पुण्य मिळते, असे सांगितले जाते.
मंदिरात गेल्याने देवाचा आशीर्वाद तर मिळतोच शिवाय अनेक फायदेही होतात. ज्योतिष शास्त्रानुसार दररोज मंदिरात गेल्याने आरोग्य तसेच समृद्धी मिळते.
मंदिरातील घंटांचा आवाज माणसाचे मन शांत करतो. त्याचबरोबर माणसाची विचार करण्याची क्षमताही वाढते.
जर तुम्ही मंदिरात जाण्याला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवले तर तुमचे मन तर शांत राहील. शिवायण तुम्हाला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळेल.
रोज सकाळी मंदिरात गेल्यास अनेक फायदे होतात. हिंदू मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्यानंतर मंदिरात गेल्याने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते.