अनेक मुलं अशी असतात जी, रिलेशनशिपमध्येही खोटं बोलतात. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या अशाच खोट्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या गर्लफ्रेंडशी किंवा पत्नीशी बोलतात.
अनेकदा पुरुष पैशांसंबंधीही खोटं बोलतात. लग्नापूर्वी मुलीला इम्प्रेस करण्यासाठी आपल्याकडे खूप पैसा आहे, असं ते मुलींना सांगतात.
सध्या लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवले जातात. अशावेळी एखादी मुलगी पसंत करताना मुलं यापूर्वी कधीही शारीरिक संबंध ठेवलं नसल्याचं सांगतात.
पार्टनरचं मन जिंकण्यासाठी मुलं अनेक खोटं बोलतात. त्यापैकी डोक्यात केवळ तुझाच विचार असतो हे एक खोटं मुलं बोलताना दिसतात.
रिलेशनशिपमध्ये मुली अनेकदा मुलांना धूम्रपान करण्यास नकार देतात. अशावेळी मुलं मी सिगारेट ओढत नाही किंवा मी सिगारेट ओढणं सोडलं असं खोटं बोलतात.
काही पुरुष एका नात्यामध्ये असताना देखील दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होतात. यावेळी पुरुष मी सिंगल आहे, असं इतर मुलींना खोटं सांगतात.