Neeraj Chopra

भारताची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राच्या फिटनेसचं रहस्य काय?

Aug 28,2023

फिटनेस

भालाफेक हा एक अतिशय कठीण खेळ मानला जातो, ज्यामध्ये खेळाडूची फिटनेस पातळी जबरदस्त असणं आवश्यक आहे.

आहार

नीरज चोप्रा त्याच्या फिटनेसवर खूप काम करतो. शिवाय, तो त्याच्या आहाराबाबत खूप कडक आहे.

शरीरातील चरबी

नीरज चोप्रा आपल्या शरीरातील फक्त 10 टक्के चरबी राखण्याचा प्रयत्न करतात. एका मुलाखतीत नीरज चोप्राने फिटनेसबाबत खुलासा केला होता.

ज्यूस किंवा नारळ पाणी

नीरज आपल्या दिवसाची सुरुवात ज्यूस किंवा नारळ पाण्याने करतो. तर त्याचा नाष्टा देखील निराळा आहे.

चार अंडी

नीरज चोप्रा नाश्त्यासाठी तीन ते चार पांढरी अंडी, दोन ब्रेड, एक वाटी दलिया आणि फळं घेतो.

आवडता नाश्ता

नीरजचा सर्वात आवडता नाश्ता ब्रेड ऑम्लेट आहे, जो तो आठवड्यातील कोणत्याही दिवशी खाऊ शकतो.

दुपारचं जेवण

नीरज चोप्रा दुपारच्या जेवणात डाळ, ग्रील्ड चिकन आणि दही आणि भातासोबत सॅलड घेतो.

रात्रीचं जेवण

नीरज चोप्रा आपल्या रात्रीच्या जेवणात सूप, उकडलेल्या भाज्या आणि फळं खातो. त्यामुळे त्याने आपली फिटनेस कायम ठेवली आहे.

VIEW ALL

Read Next Story