चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस इतके असते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जसं पृष्ठभागापासून खोलवर जातो तसा तापमानात बदल होतो.
चंद्राच्या पृष्ठभागाच्या 8 सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे 10 अंश सेल्सिअस आहे.
चंद्रावरील 1 दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांइतका असतो.
चंद्रावरील एक रात्र ही 14 दिवसांइतकी मोठी असते. त्याचप्रमाणे रात्र देखील अशीच असते.
चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. नासाच्या रिपोर्टनुसार चंद्रावरील दिवस आणि रात्रीच्या तापमानात खूप फरक आहे.
चंद्रावर दिवसा 120 अंश सेल्सियस इतके उच्च तापमान असते. यामुळे त्वचा जळू शकते.
चंद्रावर रात्रीच्या वेळेस उणे 120 अंश सेल्सियस इतके कमी तापमान असते. इतक्या थंडीत शरीरातील रक्त गोठेल.