पांडवांसोबत द्रौपदी कशी राहायची? कसे होते संबंध?

Oct 11,2023


महाभारतातील द्रौपदी आणि पांडवांबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आजही आहेत. नवीन पिढीच्या मनातील प्रश्न म्हणजे पाच पती असलेल्या स्त्रीला काळात समाजाने कसं स्वीकारलं?


द्रौपदीने फक्त अर्जुनवर प्रेम करायची आणि तिचं लग्नही अर्जुनशी झालं होतं. पण असं असूनही पाच पती स्वीकारणं आणि पत्नीचं कर्तव्य पाळणं तिला किती कठीण गेलं असेल.


एकदा सत्यभामाने द्रौपदीला विचारलं होतं की, तिने आपल्या पाच पतींना कसं ताब्यात ठेवलं? त्यावर द्रौपदीने उत्तर दिलं की, तू मला हा कसला प्रश्न विचारत आहे. तू मला दुराचारिणी स्त्रीयांबद्दल प्रश्न विचारत आहेस.


पुढे द्रौपदी म्हणाली की, मी माझा धर्म पाळते. कुठलाही पुरुष कितीही सज्जन असो पण माझ्या मनात फक्त पांडवांबद्दल भावना आहेत.


मी घर स्वच्छ आणि सुंदर ठेवते. मी स्वयंपाक करते. त्याशिवाय मी मत्सर आणि कठोर भाषेपासून दूर राहते.


मी घरात कठीण काळासाठी धान्य गुपीत ठिकाणी साठवून ठेवते. ना मी वाईट बोलते ना जिथे वाईट गोष्टी सुरु असतात तिथे जाते.


द्रौपदी म्हणाली की, मी माझ्या सासूने सांगितलेल्या धर्माचं पालन करते.

VIEW ALL

Read Next Story