भारतीय संघाने बुधवारी एकदिवसीय विश्वचषक (ODI विश्वचषक-2023) सामन्यात अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले.

दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (80) आणि अजमतुल्लाह (62) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून 272 धावा केल्या.

भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 39 धावांत 4 विकेट घेतल्या.याशिवाय हार्दिक पांड्याने 2 विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना 1-1 विकेट मिळाली.

दरम्यान या सामन्यात, मोहम्मद सिराजचे नाव अशा यादीत समाविष्ट करण्यात आले की, 11 ऑक्टोबरची तारीख त्याला आयुष्यभर लक्षात राहील. या सामन्यात सिराजने 9 षटके टाकली आणि 76 धावा दिल्या.

सिराजचा वनडेमधला हा सर्वात महागडा स्पेल आहे. 2019 मध्ये अॅडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 10 षटकात 76 धावाच दिल्या होत्या.

यासह मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.

VIEW ALL

Read Next Story