आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहत ते विठूरायाचं रूप. आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूरला जातात. पण मुंबईतील ही मंदिरं तुम्हाला माहित आहेत का ?
गिरगाव परिसरातील हे विठ्ठल-रूक्मिणीचे मंदिर सुमारे 200 वर्षाहून अधिक जुनं आहे. या मंदिराला प्राचीन वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.
हे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर ऐतिहासिक महत्त्व असलेले मुंबईतील सर्वात जुने मंदिर आहे. संत तुकारामांनी सुमारे 400 वर्षापूर्वीच या मंदिराचा पाया घातला होता. या मंदिराने वडाळाला एक नवी ओळख दिली.
125 वर्ष जुनं असलेले सायनमधील हे मंदिर 1893 साली स्थापन करण्यात आलं. हे मंदिर आशिर्वाद अपार्टमेंट, लक्ष्मीबाई केळकर मार्ग सायन रोड येथे स्थित आहे.
माहीम येथे असलेले विठ्ठल रखुमाई मंदिर हे 96 वर्ष जुनं असून 1916 साली बांधण्यात आलं. या मंदिरात असलेली गणेश आणि गरूडाची मूर्ती भाविकांच लक्ष वेधून घेते.
विलेपार्ले येथे असलेले 81 वर्ष जुनं मंदिर 1935 साली स्थापन करण्यात आलं. या मंदिराल प्रवेश करताच मंदिराची माहिती देणारा शिलालेख नजरेस पडतो.