मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. इथल्या गणेशाचे रुप पाहून मन प्रसन्न होते. इथे अनेक जण आपली ईच्छा व्यक्त करत असतात. त्यामुळे सिद्धीविनायकाच्या चरणी जाऊन तुम्हीही प्रार्थना करु शकता.
मुंबईतील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक असलेल्या या उद्यानात जाऊन तुम्ही तुमचा दिवस फ्रेश करु शकता. इथे असणारी नर्सरी पाहण्यासारखी आहे
महालक्ष्मी येथे समुद्रात असणारा हाजी अली दर्गा सर्व धर्मीयांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. प्रत्येक धर्माचे लोक येथे प्रार्थना करण्यासाठी येतात. त्यामुळे मदर्स डेच्या खास दिवशी तुम्हीसुद्धा इथे जाऊ शकता आणि तुमच्या आईसाठी प्रार्थना करुन शकता.
कुलाबा कॉजवे स्वस्त आणि चांगल्या बाजारपेठांमध्ये अव्वल स्थानावर आहे. या मार्केटला भेट देऊन तुम्ही सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकता.
गेटवे ऑफ इंडियापासून एक तासाच्या अंतरावर एलिफंटा लेणी आहेत. तुम्हाला मुंबईपासून जवळच ऐतिहासिक स्थळ पाहायाचं असेल तर एलिफंटा लेणी उत्तम पर्याय आहे.
मुंबईतील गिरगाव, दादर अन् जुहू चौपाट्यांवर तुम्ही तुमच्या आईसोबत भेट देऊ शकता. समुद्राच्या लाटांसोबत तिथे मिळणाऱ्या पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.