भाजीपाल्याचे दर कडाडले

पावसामुळं भाजीपाल्याचे दर कडाडले; नवे दर ऐकून बाजाराचा रस्ताच विसराल

पालेभाज्यांचं मोठं नुकसान

सतत सुरु असणाऱ्या पावसामुळं बऱ्याच फळभाज्या आणि पालेभाज्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळंही हा दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

कांदा

कांद्याच्या दरांमध्ये मात्र काहीशी सुधारणा झाल्यामुळं शेतकऱ्याला याचा फायदा होत आहे. होलसेल बाजारात कांदा 10 ते 15 रुपये आणि किरकोळ मार्केटमध्ये तो 25 ते 30 रुपये किलो इतक्या दरावा विकला जात आहे.

टोमॅटो

इतर भाज्यांच्या बाबती सांगावं तर, टोमॅटो होलसेल बाजारात 40 ते 60 रुपये किलो तर, किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये प्रति किलो किमतीला विकले जात आहेत.

मिरची

मिरचीचा ठसका वाढला असून, होलसेल बाजारात ती 60 ते 80 रुपये किलो तर, किरकोळ बाजारात 120 ते 140 रुपये प्रति किलो इतक्या किमतीला विकली जात आहे.

लसूण

लसूणाची किंमत वाढली असून, होलसेल बाजारात तो 45 ते 75 आणि किरकोळ बाजारात 200 ते 240 रुपये प्रति किलो इतक्या दराला विकला जात आहे.

आलं

आलं होलसेल बाजारात 90 ते 180 रुपये प्रति किलो आणि किरकोळ बाजारात 200 ते 240 रुपये प्रति किलो इतक्या किमतीला विकलं जात आहे.

फरसबी

पुलाव, भाजी, चायनिज अशा पदार्थांमध्ये वापरली जाणारी फरसबी होलसेल बाजारात 70 ते 75 रुपये आणि किरकोळ बाजारात 180 ते 200 रुपये प्रती किलो इतक्या किमतीला विकली जात आहे.

हिरवा वाटाणा

हिरवा वाटाणा किंवा मटार होलसेल बाजारात 70 ते 80 रुपये प्रति किलो दरावा विकला जात असून, किरकोळ बाजारात त्याचे दर 160 ते 200 रुपये प्रति किलो इतके आहेत.

VIEW ALL

Read Next Story