शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना थोडी रिस्क घेणं आवश्यक असतं. मात्र त्याबरोबरच थोडी नशिबाची साथही लागते असं म्हटलं जातं.
अर्थात आज अगदी मोबाईलच्या माध्यमातूनही शेअर्सची खरेदी-विक्री करता येत असल्याने नेमकं कुठे आणि कशी गुंतवणूक करावी याचा फारसा अभ्यास न करता झटपट कमाई म्हणूनही शेअर बाजाराकडे पाहिलं जातं.
मात्र विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वी गुंतवणूक केल्यास अपेक्षेहूनही अधिक परतावा मिळू शकतो. याचीच झळक दाखवणारी एक यादी सध्या व्हायरल होतेय.
उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला Waaree Renewable Technologies Renewable कंपनीचं नाव घेता येईल.
मागील एका वर्षात Waaree Renewable Technologies Renewable कंपनीच्या शेअर्सची किंमत 830 टक्क्यांनी वाढली आहे.
Waaree Renewable Technologies Renewable कंपनीच्या शेअर्सने केलेल्या दमदार कामगिरीची आकडेवारी 'आयसीआयसीआय डायरेक्ट'ने मांडली आहे.
म्हणजेच या कंपनीमध्ये 3 वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या व्यक्तीला 81 लाख रुपये परतावा मिळाला असता, असं आयसीआयसीआय सांगते.
त्याचप्रमाणे केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीमध्ये 3 वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवणाऱ्याला आजच्या घडीला एकूण परतावा 79 लाख 57 हजार रुपये इतका मिळाला असता.
'आयसीआयसीआय डायरेक्ट'ने शेअर केलेली ही संपूर्ण यादी पाहा. यातील टॉप 20 पैकी सर्वात कमी परतावा देणाऱ्या कंपनीने 1 लाखांचे जवळपास 6 लाख करुन दिलेत.
Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.