सर्वात कमी मांस खाणारा देश कोणता? कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर

Swapnil Ghangale
Jun 25,2024

रोज मांसाहार करतात

जगभरातील कोट्यवधी लोक मांसाहाराला प्राधान्य देतात. अनेक देशांमध्ये तर लोक रोज मांसाहार करतात.

सर्वात कमी मांसाहार करणारा देश कोणता?

त्यामुळेच सहज विचार केल्यास असा प्रश्न पडतो की जगातील सर्वाधिक शाकाहारी व्यक्ती असलेला देश कोणता? किंवा सर्वात कमी मांसाहार करणारा देश कोणता?

सर्वाधिक शाकाहारी लोक असलेला देश कोणता?

तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाही हवं असेल तर त्याचं उत्तर भारत असं आहे. भारतामध्ये सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात असं एक अहवाल सांगतो.

भारतात शाकाहारी किती?

भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 38 टक्के लोक शाकाहारी आहेत. हे लोक केवळ शाकाहारी भोजन पसंत करतात.


मांस कमी खाणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इस्रायल असून येथील 13 टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे.

सर्वात कमी मांस खाणाला तिसरा देश

तर तैनाव या देशाचा सर्वाधिक शाकाहारी लोक असलेल्या देशांच्या यादीत तिसरा क्रमांक आहे. येथील 12 टक्के लोक शाकाहारी आहेत.


इटलीमधील 10 टक्के लोक शाकाहारी आहेत, असं पीयू रिसर्चच्या अहवालामध्ये म्हटलं आहे.

पाचव्या स्थानी ऑस्ट्रिया

9 टक्के लोकसंख्या शाकाहारी असलेला ऑस्ट्रिया या यादीत पाचव्या स्थानी आहे. इथेही मांस खाणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.

यादीत जर्मनीचाही समावेश

सहाव्या स्थानी युरोपमधील जर्मनी देशाचा क्रमांक लागतो. येथील 9 टक्क्यांहून कमी लोक शाकाहारी आहेत.

VIEW ALL

Read Next Story