थांबा!

विकेंडला मुंबईबाहेर जात असाल तर थांबा! मराठा आरक्षण मोर्चामुळे वाहतूक बंद?

वाहतुकीतील बदलांबाबत अधिसूचना

Maratha Reservation Protest : गुरुवारी मराठा मोर्चा नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्र येणार असल्याने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील वाहतुकीतील बदलांबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे.

अवजड वाहतूक बंद

नवी मुंबईत अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. डी पॉईंटपासून पुणे, गोव्याला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे, पुणे, गोव्याकडे जाण्यासाठी कळंबोली सर्कलहून पळस्पे खारपाडा मार्गे वळवण्यात आली आहे.

इथं प्रवेशबंदी

मुंबई- पुणे एक्सप्रेसरवून कोनफाटा दिशेनं वाहनांना (मोर्चातील वाहनं वगळून) प्रवेशबंदी आहे. त्यामुळं ही वाहनं कळंबोली सर्कलमार्गे वळवावीत.

खालापूर

मुंबई- पुणे एक्सप्रेसरवून बार्ले टोलनाका दिशेनं पळस्पेकडे वाहतूक बंदी असून, ही वाहतूक खालापूर मार्गे वळवण्यात आली आहे.

खारपाडा- पळस्पेमार्गे वाहतूक

गावमार्ग मुंबई, नवी मुंबई आणि जेएनपीटीकडे येणाऱ्या वाहनांना पळस्पे सर्कलवरून वळवण्यात आलं आहे. ही वाहनं खारपाडा- पळस्पेमार्गे पुढे जातील.

रसायनी

खालापूर रसायनीहून दांडफाटा मार्गे शेडुंगहून पळस्पेला येणारी वाहतूक बंद असून, ही वाहनंसुद्धा कळंबोली सर्कलमार्गे वळवण्यात आली आहेत.

VIEW ALL

Read Next Story