शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
शेवग्याच्या केवळ शेंगाच नाही तर याच्या पानांचा देखील भाजीसाठी वापर केला जातो. शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पाने ही अतिशय आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.
शेवग्याला ड्रमस्टिक असे देखील म्हणटले जाते.नाश्ता करताना ड्रमस्टिक किंवा शेवग्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे पेय जेवणासोबत किंवा नंतर घेतल्यास ते पचनास मदत करते, असे मानले जाते.
ड्रमस्टिक सूप संधिवात वेदना कमी करण्यास मदत करते. त्याच्या पानातही अनेक गुणधर्म आढळतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शेवग्याच्या विविध घटकांमध्ये मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत
शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो.
शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याची शेंग खूप फायदेशीर ठरते. या शेवग्याच्या शेंगा, साल आणि पानामध्ये मधुमेहाला प्रतिबंधित करणारे गुणधर्म आहेत. याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळते,
शेवग्याच्या शेंगाची ताजी पाने किंवा शेंगाचा पावडर पाण्यात घाला, ते भिजू द्या आणि गाळून घ्या. हा एक हायड्रेटिंग पेय म्हणून त्याचा आनंद घ्या. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात, म्हणून शेवग्याचे पाणी सुपरफूड मानले जाते, असेही त्या नमुद करतात.