भारतामधील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं.
भारतामध्ये रोज 13 हजारांहून अधिक ट्रेन्स वेगवेगळ्या मार्गांवर धावतात.
भारतामधील रेल्वेचं जाळं हे 68 हजार किलोमीटरचं आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या यादीमध्ये भारत चौथ्या स्थानी आहे.
विशेष म्हणजे एवढं मोठं नेटवर्क असूनही भारतामध्ये केवळ एकच ठिकाण असं आहे जिथे सर्व बाजूने येणारे ट्रेन्सचे मार्ग एकमेकांना इंटरसेक्ट करतात.
अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास ही अशी जागा असते जिथे चारही बाजूंनी ट्रेन येऊ आणि जाऊ शकतात.
भारतामध्ये चारही बाजूने ट्रेन येणाऱ्या या इंटरसेक्शनला डायमंड क्रॉसिंग असं म्हणतात.
भारतामधील हे एकमेव डायमंड क्रासिंग महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आहे.
चारही बाजूंनी ट्रेन येत असल्या तरी रेल्वेकडून या ठिकाणी अगदी सुनियोजित पद्धतीने वाहतूक हाताळली जात असल्याने अपघात होत नाहीत.