राम सिया राम गाण्याची सगळीकडे चर्चा

प्रभास आणि क्रिती सेनन यांचा 'आदिपुरुष' या चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणे सध्या फार चर्चेत आहे. हे गाणे ऐकताना लोक भक्तीत तल्लीन झालेले दिसतात.

बेखयाली गाण्याने दिली होती प्रसिद्धी

'राम सिया राम' हे गाणे गायक जोडी सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांनी गायले आहे. अभिनेता शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' या चित्रपटातील 'बेखयाली' या सुपरहिट गाण्याने या जोडीला खरी ओळख मिळाली.

अनेक संघर्षांनंतर मिळाले यश

पण या जोडप्याने अनेक संघर्षांनंतर हे यश मिळवले आहे. दोघांनी एकदा रिअॅलिटी शोमध्ये गाण्यासाठी नशीब आजमावले होते, पण त्यावेळी यश मिळू शकले नाही.

'द व्हॉइस इंडिया'ने दिली ओळख

2015 मध्ये, साचेत आणि परंपरा 'द व्हॉइस इंडिया' या सिंगिंग रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसले. शोच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात दोघेही यशस्वी झाले, पण विजेते होऊ शकले नाहीत.

शोनंतर खडतर वाट सुरु

शो संपल्यानंतर दोघांनी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला, पण त्यांना सतत सर्व बाजूंनी नकार मिळत होता

सोशल मीडियाने दिली पसंती

पण दोघांनीही हार मानली नाही आणि दोघांनी गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू लागला. यानंतर त्याला 'रेहना तू पल दिल के पास' गाण्याची संधी मिळाली.

या गाण्यामुळे मिळालं आणखी यश

'कबीर सिंग'मधील 'बेखयाली' या गाण्याने दोघांना प्रसिद्धी दिली. या जोडीने आतापर्यंत 'शिव तांडव', 'मलंग सजना', 'चुरा लिया' आणि 'मेहंदी वाले हाथ' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत.

'द व्हॉईस इंडिया' पासून प्रेमकहाणीला सुरुवात

सचेत आणि परंपरा यांच्या वैयक्तिक आयुष्याची सुरुवात, 'द व्हॉईस इंडिया'च्या फिनालेपासून झाली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतरही दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही

2020 मध्ये बांधली लग्नगाठ

एकत्र काम करत असताना, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर 27 नोव्हेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली.

संगीत क्षेत्रात निर्माण केले महत्तवाचे स्थान

हे स्टार जोडपे आपल्या सुरेल आवाजाने लोकांना वेड लावत आहे आणि 'सचेत-परंपरा' या जोडीच्या रूपात संगीत क्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. (सर्व फोटो -@sachetparamparaofficial/instagram)

VIEW ALL

Read Next Story