पुणेकरांनो RTO ने दिलेला 'हा' Whatsapp नंबर सेव्ह करा आणि मुजोर रिक्षाचालकांना धडा शिकवा

तातडीने कारवाई

पुण्यात रिक्षा आणि ट्रॅव्हल्सच भाडे नकारणाऱ्यांवर तातडीने होणार कारवाई.

व्हाट्सअप क्रमाकांवरुन तक्रार

आता पुणेकरांना थेट व्हाट्सअप क्रमाकांवरुन करता येणार तक्रार

थेट पोलिसांकडे करा तक्रार

भाडं नाकारणाऱ्या रिक्षा तसेच टॅव्हल्स चालकांविरोधात थेट पोलिसांकडे तक्रार करता येणार आहे.

परिवहन विभागाकडून नवी सुविधा

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा चालकांची तक्रार करण्यासाठी व्हाट्सअप क्रमांकाची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

चाप बसणार

भाडे नाकारणे, मीटर पेक्षा जास्त भाडे घेणे, खाजगी ट्रॅव्हल्सकडून घेण्यात येणारे जास्तीचे तिकीट याला यामुळे चाप बसणार आहे.

नंबर काय?

8275330101 या व्हॉट्सअप नंबरवर पुणेकरांना रिक्षा चालक आणि ट्रॅव्हल्स चालकांची तक्रार करता येणार आहे.

या क्रमांकामुळे मिळणार सुटकारा

या व्हॉट्सअप क्रमांकामुळे पुणेकरांना किमान भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांपासून तरी सुटकारा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

VIEW ALL

Read Next Story