रेल्वे प्रवासादरम्यान आपण विविध गोष्टी पाहत असतो. त्यातील अनेक गोष्टी आपल्या कायमच्या लक्षात राहतात.
भारतातील काही रेल्वे स्थानके इतकी सुंदर आहेत की प्रवासावेळी तुमची नजर तिथून हटणार नाही.
अशा रेल्वे स्थानकांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्यापुढे राजमहलाचे सौंदर्यदेखील फिके पडते.
मध्य प्रदेशचे राणी कमलापती रेल्वे स्थानक जगातील सुंदर स्थानकांमध्ये गणले जाते.
महाराष्ट्रातील सीएसएमटी रेल्वे स्थानक अलिशान इमारतीसाठी ओळखलं जातं.
लखनौचे चारबाग रेल्वे स्थानक ब्रिटीश आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना आहे.
कानपूर रेल्वे स्थानक सुंदर इमारतीसाठी ओळखले जाते. येथे रोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
रेल्वे प्रवासावेळी या स्थानकांना नक्की भेट द्या.