आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी की-बोर्ड वापरला असणार. मात्र की-बोर्डवरील स्पेसबारचं बटण हे इतर बटणांपेक्षा मोठं का असतं तुम्हाला माहितीये का?
खरं तर स्पेसबारचं मुख्य काम शब्दांमध्ये अंतर म्हणजेच स्पेस टाकण्यासाठी केला जातो.
तसेच व्हिडीओ पॉज करण्यासाठी किंवा प्लेसाठी किंवा मेन्यूमधून रोटेट करण्यासाठी स्पेसबार वापरतात.
स्पेसबार हा की-बोर्डवरील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या बटणांपैकी एक आहे.
पण स्पेसबारची लांबी एवढी का असते हे माहितीये का? तर यामागील खरं कारण आहे टायपिंग!
स्पेसबार हा की-बोर्डच्या खालच्या भागात असतो. त्यामुळे अंगठ्याने तो वापरणं सहज शक्य असतं.
टायपिंग करताना शब्दांमध्ये स्पेस टाकण्यासाठी दोन्ही अंगठ्यांनी बटण दाबता यावं म्हणून स्पेसबार एवढ्या मोठ्या आकाराचा आणि लांबलचक असतो.
दोन्ही बोटांनी स्पेसबार वापरता आला तर टायपिंगचा वेग कायम राखता येऊ शकतो. हेच लॉजिक तुमच्या स्मार्टफोनमधील क्वार्टी की पॅडलाही लागू होतं. टायपींग करताना तुम्ही दोन्हे अंगठे स्पेस देण्यासाठी वापरता.