सिंहगडावरील पिठलं भाकरी

काहीही खावा, पण पिठलं भाकरीला तोड नाही. पुण्यात आल्यावर सिंहगडावर गेला तर बेसनाचे पिठलं आणि ज्वारी भाकर झाल्याशिवाय समाधान मिळत नाही. त्याचबरोबर मटक्याचं दही खाल्यावर पोट देखील भरत नाही.

हाऊस ऑफ पराठा

लस्सी, ताक, सलाड, पराठा, 8-9 व्हेजीटेबल करी, दम बिर्याणी असे चविष्ठ पदार्थ समोर आल्यावर किती खावं असा प्रश्न पडेल, अशी हाऊस ऑफ पराठाची बाहूबली थाळी प्रत्येकाने ट्राय करायला हवी.

इट्स मी स्ट्रीट फूड

पुण्याच्या औंध परिसरात असलेल्या 'इट्स मी स्ट्रीट फूड' (It's Me Street Cafe) कॅफेमध्ये खवय्यांची मोठी गर्दी पहायला मिळते. खास मसाल्यांनी तयार केला जाणारा पिझ्झा, मोमोज खाण्यासाठी पुणेकर उत्सुक असतात.

बाजीराव मिसळ थाळी

पुणे मिसळ हाऊसची (Pune Misal House) बाजीराव मिसळ थाळी सेलिब्रिटींचं खास आकर्षण आहे. घरगुती मसाल्यांची चव असलेली मिसळ खाण्यासाठी अनेक कलाकार तसेच राजकीय प्रतिनिधी उपस्थिती लावतात.

गार्डनचा वडापाव

पुण्यातील जुनं आणि प्रसिध्द असं गार्डन वडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. झणझणीत वडापाव, वडापावचा चुरा आणि ताक पिण्यासाठी कॉलेजच्या पोरांची रिघ लागते.

कैलासची भेळ

कधी पुण्यातील खेड शिवापूर भागात गेला तर कैलासची भेळ नक्की ट्राय करावी, खास शेवचा वापर करत तयार केलेली ही भेळ पुण्याचं खास आकर्षण आहे.

गुडलक कॅफेचा खिमापाव

पुण्यातील सर्वात जुनं इराणी कॅफे असलेलं गुडलक कॅफे पुण्याची शान आहे. ब्रेकफास्ट करायचा असेल तर गुडलक शिवाय पर्याय नाही. चीज ऑमलेट आणि खिमापाव झालाच पाहिजे.

Top 7 Food Places in Pune: खवय्यांसाठी पुण्यातील 7 बेस्ट ठिकाणं; तुम्ही ट्राय केलीत का?

VIEW ALL

Read Next Story