फोर्ट परिसरात असणारं हे केरळच्या खाद्यसंस्कृतीच्या जवळ नेणारं ठिकाण. इथं सद्या पद्धतीतही जेवण मिळतं. या ठिकाणी तुम्ही मासे, चिकन- मटण आणि शाकाहारी दाक्षिणात्य पद्धतींचा फडशा पाडू शकता. अस्सल दक्षिणेकडील चव असणारे पदार्थ म्हणजे या ठिकाणाचं वैशिष्ट्य.
इथं यायचं म्हणजे पोटात जागाच करून या. त्यातही मांसाहारावर ताव मारणारे असाल तर इथं मटण आणि चिकन बिर्याणी नक्की खा. शाही तुकडा आणि कॅरामल कस्टर्ड इथं तुमच्या गोड चवीही पुरवतील.
माटुंगा स्थानकाबाहेर येताच तुम्हाला अगदी सहजपणे सापडणारं हे ठिकाण. केळीच्या पानावर साग्रसंगीत दाक्षिणात्य शाकाहारी पदार्थ पाहून इथं तुमचं मन तृप्त झालंच म्हणून समजा.
दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या आस्वाद उपहार गृहात तुम्हाला मसालेभात, पिठलं भाकरी, डाळींबी- भाकरी, थालीपीठ अशी अस्सल महाराष्ट्राची चव असणाऱ्या पदार्थांची मेजवानी खाता येईल.
मुंबईतील काळाघोडा परिसरात असणाऱ्या चेतना रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला शाकाहारी थाळीची चव चाखता येईल. इथं तुमच्याकडे थाळीत संपता संपणार नाहीत इतक्या पदार्थांची रांग असेल. विविध प्रकारचे ढोकळे, रोट्या, करोरी आणि बरंच काही इथं चाखता येईल.
मुंबईत चाखा दाक्षिणात्य पदार्थांपासून लज्जतदार बिर्याणीची चव