सणासुदीच्या काळात कारची मागणी वाढलेली दिसून येते. डीलरशिप शोरुममध्ये डेमो म्हणून ठेवलेल्या मॉडेलचीही विक्री करतात, असे अनेकदा दिसून आले आहे. अनेकदा अशा वाहनांना डेंट किंवा डॅमेजही असतात जे दुरुस्त करुन लपवले जातात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमच्या कारची डिलिव्हरी घेत असाल, तेव्हा कारची नीट तपासणी करा आणि त्याबद्दल डीलरशिपला विचारा.
कार घेताना कार किती मायलेज देते, हे माहित करुन घ्या. मायलेजचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. तुमची नवीन कार जितका कमी मायलेज देईल तितकी तिची किंमत जास्त असेल. त्यामुळे वाहनाच्या इंजिन आणि वैशिष्ट्यांसोबतच त्याचे मायलेज जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
वॉरंटी किती काळ आहे हे विचारणे पुरेसे नाही. वॉरंटी अंतर्गत सर्व काय समाविष्ट आहेत हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे. बर्याच वेळा तुम्ही वर्कशॉपमध्ये कार खराब झाल्यामुळे दुरुस्तीसाठी जाता, तेव्हा तुम्हाला असे नियम सांगितले जातात ज्याबद्दल तुम्हाला आधीच माहिती नसते. म्हणूनच हे नियम आधी समजून घेणे महत्त्वाचे आहे.
दुसरा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तो कारच्या वॉरंटीशी संबंधित आहे. आजकाल कंपन्या किलोमीटर किंवा वर्षाच्या आधारावर वॉरंटी देत आहेत. तुम्हाला मानक वॉरंटी कमी वाटत असल्यास, तुम्ही विस्तारित वॉरंटी देखील घेऊ शकता.
बर्याचदा कार कंपन्या त्यांच्या विविध कार मॉडेल्सवर डिस्काउंट ऑफर देत असतात. ज्याबद्दल सामान्य लोकांना माहितीही नसते. एक्स्चेंज बोनस बदलण्यासाठी रोख सवलत यासारख्या सुविधा वाहनांवर उपलब्ध आहेत.
नवीन कार खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. पैसा पैसा जमवून काही जण नवीन कार घेण्यासाठी शोरुममध्ये जातात. अनेक वेळा त्यांची विक्री वाढवण्यासाठी डीलरशिप अशा कार ग्राहकांना माथी मारतात, ज्यामध्ये त्यांना तोटा सहन करावा लागतो.
नवीन कार खरेदी करताना आपल्याला काही गोष्टी माहित नसतात. त्यामुळे आपल्याल फायदा होण्याऐवजी तोटा होते. अनेक वेळा डीलरशिप ग्राहकांना त्यांची विक्री वाढवण्यासाठी अशी कार माथी मारतात की, ज्यामुळे आपल्याला तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही डीलरशिपकडून 5 प्रश्न विचारले पाहिजेत. त्यामुळे भविष्यात पश्चाताप होण्याची वेळ माहित नाही.