या भारतीयांना पुरस्कार

याआधी 'भारत गौरव पुरस्कार' आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, अभिनेते मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गूगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जी-मेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे.

20 देशांतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार

या पुरस्कार सोहळ्यात डॉ. नरेश त्रेहान, अंकित जालान, शास्त्रज्ञ सीईआरएन अर्चना शर्मा, पोलंडच्या अमित लाथ यांच्यासह जपान, उझबेकिस्तान, भारत, यूएसए, यूके, युरोप, न्यूझीलंड, फ्रान्ससह जगभरातील 20 देशांतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत वितरण होणार आहे.

ब्रिटिश संसदेत सन्मान

ब्रिटिश संसदेत आमदार मेघना बोर्डीकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत होणार असून, मागील दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो.

भारत गौरव पुरस्कार

लंडनमधील भारतीयांतर्फे देण्यात येणारा 'भारत गौरव पुरस्कार' यंदा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांना जाहीर झाला आहे. इंग्लंडची राजधानी लंडनमधील ब्रिटिश संसदेत 'हाउस ऑफ कॉमन्स'मध्ये 12 मे रोजी होणाऱ्या सोहळ्यात संबंधित पुरस्कार देण्यात येणार आहे.

मेघना बोर्डीकर यांच्या या कार्याची दखल

मेघना बोर्डीकर यांनी सामाजिक, जलसंधारण आणि पर्यावरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोर्डीकर यांनी पर्यावरण विषयक कामांना न्याय दिला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम, नोकरी मेळावे, दिव्यांगांसाठीचे काम करून त्यांनी सरकारी योजना घरोघरी पोहोचविल्या आहेत.

मेघना बोर्डीकर यांचे काम..

मेघना बोर्डीकर या महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवत आहेत. महिलांना अधिक सक्षम होण्यासाठी मदत करत आहेत. नोकरी मेळावे, दिव्यांगांसाठीचे काम करुन त्यांनी सरकारी योजना घरोघरी पोहोचविल्या आहेत.

आमदार मेघना बोर्डीकर

आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. ब्रिटिश संसदेत होणार गौरव आहे. मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर या महाराष्ट्रातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.

ब्रिटिश संसदेत गौरव होणाऱ्या मेघना बोर्डीकर कोण आहेत?

VIEW ALL

Read Next Story