बाजारात पाण्याच्या बॉटलची किंमत 10 रुपयांपासून सुरुवात होते. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागडी बॉटल किती रुपयांला मिळते.
जगातील सर्वात महागडी पाण्याच्या बॉटलचे नाव Fillico Jewelry Water असं आहे.
जपानमध्ये हे पाणी मिळते. या बॉटलची किंमत 1.15 लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच या किंमतीत तुम्ही एक बाईक खरेदी कराल
जपानमध्ये याला नूनोबिकी वॉटर असं म्हणतात. याचे पाणी जपानच्या कोबे परिसरात असलेल्या झऱ्यातून आणले जाते.
बॉटलमध्ये स्वारोवस्की क्रिस्टल, सोनं आणि चमकणारे पंख लावण्यात आले आहेत
ही बॉटल खूप बारकाईने डिझाइन करण्यात आली आहे.