महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
फडणवीसांनी आपली राजकीय कारकिर्द भारतीय जनता पार्टी आणि भाजपचे वॉर्ड संयोजक म्हणून सुरु केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याच्या वाटेवर असलेले देवेंद्र फडणवीस कितवी शिकलेयत? त्यांच्याकडे कोणत्या पदवी आहेत? जाणून घेऊया.
देवेंद्र फडणवीसांचे प्राथमिक शिक्षण इंदिरा कॉन्व्हेंट शाळेतून झाले. काही कारणांमुळे त्यांना शाळेतून नाव कमी करावं लागलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार फडणवीसांनी नागपूरच्या सरस्वती विद्या मंदिर येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं.
1986 मध्ये त्यांनी धरमपेठ ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
त्यांनी नागपूरच्या सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले.
याव्यतिरिक्त त्यांनी जर्मन फाऊंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन येथून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केलाय.
1997 मध्ये फडणवीस नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण महापौर होते.
2014 मध्ये 44 वर्षांचे असताना ते मुख्यमंत्री बनले. शरद पवार यांच्यानंतरचे महाराष्ट्रातले दुसरे तरुण मुख्यमंत्री ठरले.