पावसाळ्यात भजी- वडे खाण्याचा मोह का आवरत नाही? शास्त्रीय कारण

Aug 29,2024

भजी, वडे

मुसळधार पाऊस, थंडगार वारा आणि त्यातच भूक लागली, की अनेक मंडळींची पसंती असते भजी, वडे किंवा तत्सम चमचमीत पदार्थांना. पण, ही इच्छा नेमकी का होते, माहितीये?

ढगांची दाटी

पावसाळ्यादरम्यान सूर्यप्रकाश कमी होऊन काहीसं अंधारमय वातावरण होतं आणि याच कारणामुळं भजी- वडे खाण्याची इच्छा होते.

हॅपी हार्मोन

पावसाच्या दिवसात सूर्यकिरणांच्या अभावी विटामीन डी वर परिणाम होत हॅपी हार्मोन सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं.

कार्बोहायड्रेट

अशा दिवसांमध्ये शरीराला कार्बोहायड्रेटची गरज भासते. कारण, त्यामुळेच या हॅपी हार्मोनची निर्मिती होत असते.

दमटपणा

सेरोटोनिनशिवाय तळलेल्या पदार्थांमध्ये दमटपणा कमी असतो. ज्यामुळं तोंडात कुरकुरीतपणा लगेचच जाणवतो आणि दमटपणामध्ये असे खाद्यपदार्थ आरामदायी ठरतात.

मसालेदार अन्नपदार्थ

काही निरीक्षणांनुसार गरमागरम आणि मसालेदार अन्नपदार्थ शरीराचं तापमान वाढवण्यास मदत करतात, म्हणूनच पावसाळ्याच भजी- वडे खाण्याचा मोह आवरत नाही.

VIEW ALL

Read Next Story