पाणीपुरी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. भारतात प्रत्येक राज्यात या पदार्थाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते
पण तुम्हाला माहितीये का पाणीपुरी पहिल्यांदा कोणी बनवली
पाणीपुरीचा संबंध महाभारताशी आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे नाहीत
पहिल्यांदा पाणीपुरी द्रौपदीने बनवली होती. असं म्हणतात सासरी आल्यानंतर तिने पहिला पदार्थ पाणीपुरी बनवली होती
द्रौपदीला पारखण्यासाठी कुंतीने एक काम दिलं होतं. नंतर द्रौपदीने कणिक आणि भाज्यांपासून एक स्वादिष्ट पदार्थ बनवला होता
महाभारताव्यतिरिक्त पाणीपुरीचा संबंध मगधशीही जोडला जातो. पाणीपुरीला पहिले मगधमध्ये फुल्की नावाने ओळखलं जायचं.