'सोनेपे सुहागा' ही हिंदी भाषेतील म्हणं आपण ऐकली असेल. मराठीत सोन्याहून पिवळं असा उल्लेख केला जातो.

Pravin Dabholkar
Nov 05,2024


'सोनेपे सुहागा' ही हिंदी भाषेतील म्हणं आपण ऐकली असेल. मराठीत सोन्याहून पिवळं असा उल्लेख केला जातो.


पण सुहागा म्हणजे नक्की काय? त्याचा सोन्याशी काय संबंध? या सुहागाबद्दल जाणून घेऊया.


सुहागा क्रिस्टलसारखी ठोस वस्तू आहे जी तुरटीसारखी दिसते. पण गुण,चवीत दोघांमध्ये खूप फरक आहे.


सुहागाचा रंग पांढरा असतो आणि याला वास नसतो. सुहागाच्या क्रिस्टलपासूनच त्याची पावडर बनते.


सुहागा बोरेक्स असं म्हटलं जातं. याचं वैज्ञानिक नाव सोडियम टेट्राबोरेट किंवा डायसोडियम टेट्राबोरेट असे आहे.


हे सफेद पावडरच्या रुपात मिळतं. जे पाण्यात सहज मिसळतं.यालाच बोरेक्स पावडर असं म्हणतात.


आयुर्वेदात अनेक आजार दूर करण्यासाठी सुहागाचा वापर केला जातो.


कफ, खोकला सारख्या आजारात याचा उपयोग होतो. तिबेट, लडाख, काश्मीरमध्ये हे जास्त मिळते.


सोन्याचे दागिन बनवताना सोन विरघळवलं जातं तेव्हा सोन्यात सुहागा मिसळला जातो.


यानंतर सोन्यातील अशुद्धता वेगळी होते. यामुळे सोने शुद्ध आणि नरम बनते.


सोन्यात सुहागा मिसळल्याने सोने जटिल होते. त्यामुळे सोने पे सुहागा असं म्हटलं जातं. ज्वेलर्समध्ये हे सहज मिळतं.

VIEW ALL

Read Next Story