जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही.
आरोग्यदायी जीवनासाठी रोज पुरेशी झोप घेणं महत्वाचं असतं. मात्र काहींना रात्रीची शांत झोप लागत नाही आणि याच कारण व्हिटॅमिनची कमतरता देखील असू शकते.
मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हे दोन हार्मोनच्या कमतरतेमुळे शांत किंवा गाढ झोप येत नाही. या हार्मोनला वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी6 उपयोगी ठरते.
शरीरात व्हिटॅमिन बी6 ची कमतरता झाल्यास शांत झोप लागत नाही.
व्हिटॅमिन बी6 ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे सेवन करायला हवे.
गाजरमध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर सारखी पोषकतत्व असतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)