वडील होण्याचं योग्य वय कोणतं?, 90% पुरुष करतात 'ही' चूक

नेहा चौधरी
Jan 16,2025


कायम आई होण्याचं योग्य वय काय आहे, असा प्रश्न विचारला जातो. पण वडील होण्याचं योग्य वय काय असतं याबद्दल चर्चा होत नाही.


तज्ज्ञांच्या मते पुरुषांचेही वडील होण्यासाठी योग्य वय असतं. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वाढत्या वयानुसार पुरुषांमध्येही बदल होत असतात.


तज्ज्ञ सांगतात की, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या दररोज तयार होत असते.


पण जसजसे वय वाढत जाते तसतसे त्याची संख्या आणि गुणवत्ताही कमी होते.


त्यामुळे 20 ते 30 वर्षे हे वडील बनण्यासाठी योग्य वय आहे.


शुक्राणूंची संख्याही चांगली राहावी यासाठी पुरुषांनी काही गोष्टींपासून दूर राहावे.


धुम्रपान टाळा, बाहेरील अन्नाचे सेवन कमी करा आणि आपल्या आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.


तसंच अल्कोहोलपासून अंतर ठेवा, याचा शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम होतो. रोज व्यायाम करा आणि योग्य आहार घ्या.


(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

VIEW ALL

Read Next Story