अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतीच तिने 'संगीत मानापमान' चित्रपटाच्या ट्रेलर लॉंन्च सोहळ्याला हजेरी लावली होती.
यावेळी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
त्यासोबतच अमृताने पिवळ्या साडीवर मोत्याचे दागिने परिधान केले होते. तसेच मॅचिंग कानातले आणि हातात बांगड्या देखील तिने घातल्या होत्या.
अमृता हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.