योग्य वय

जीमला जाण्याचं योग्य वय काय? घाई तर अजिबात करू नका

शारीरिक सुदृढता

हल्ली शारीरिक सुदृढतेचा प्राधान्यस्थानी ठेवत जीमला जाण्यासाठी अनेकजण प्राधान्य देतात. पण, त्यासाठीच्या योग्य वयाचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

शरीरयष्टी

पिळदार शरीरयष्टीसाठी किंवा मग कमनीय बांध्यासाठी तुम्ही जीम लावणार असाल तर 15 वर्षांआधी हा निर्णय घेणं महागात पडू शकतं.

स्नायू

तज्ज्ञांच्या मते 15 ते 17 वर्षांच्या वयोगटातील व्यक्तीनं स्नायूंना अपेक्षेहून जास्त ताण देणारा व्यायाम करु नये.

व्यायामाचे परिणाम

वरील वयामध्ये चुकीचा व्यायाम केल्यास त्याचा थेट परिणाम तयार होणाऱ्या स्नायूंवर आणि हाडांवर होतो. त्यामुळं 17 व्या वर्षापर्यंत हलक्या व्यायामाला प्राधान्य द्यावं.

जीम ट्रेनर

18 ते 20 वर्षे वयोगटातील व्यक्तींनी जीम ट्रेनरच्या निरीक्षणाखाली व्यायाम करण्यास सुरुवात करावी. कारण, या वयात शरीर पूर्णपणे विकसित असतं.

नियमित व्यायाम महत्त्वाचा

20 व्या वर्षानंतर तुम्ही व्यायामप्रकार वाढवत हळुहळू अपेक्षित ध्येय गाठू शकता. पण, नियमित व्यायाम महत्त्वाचा. (वरील माहिती सामान्यज्ञानावर आधारित असून, कोणत्याही बदलाआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story