ITR म्हणजे काय?

आयटीआर म्हणजेच आयकर रिटर्न हा करदात्यांनी भारतीय प्राप्तिकर विभागाला त्यांचे उत्पन्न आणि मालमत्तेचा अहवाल देण्यासाठी वापरला जाणारा इन्कम रिटर्न फॉर्म आहे.

यामध्ये करदात्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाशी संबंधित तपशील असतो. आयटीआर बहुतेक इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये दाखल केला जातो. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी ते मॅन्युअली फाइल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

आयटीआर भरणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून आपल्या आर्थिक आयुष्याचा आलेख सरकारी कागदपत्राद्वारे सिद्ध करण्यासाठी तसेच करदात्याच्या संपत्ती व मालमत्तेच्या वैध स्त्रोताबाबत तो कायदेशीर व उपयुक्त पुरावा देखील असतो.

करदाता एक व्यक्ती, फर्म, ट्रस्ट, कंपनी किंवा समाज असू शकतो. आयकर भरताना व्यक्तीला कोणतेही कागदपत्र जोडावे लागत नाही.

लोकांना आयटीआर भरताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आयकर विभागाने घरी बसून आयटीआर ऑनलाइन फाइल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याला इलेक्ट्रॉनिक फाइलिंग (ई-फायलिंग) असेही म्हणतात.

कायद्यानुसार, काही श्रेणी तयार केल्या आहेत त्यानुसार सर्व करदात्यांना विशिष्ट वेळेत कर भरावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही. ही मर्यादा ओलांडणाऱ्या व्यक्तीला आयटीआर भरावा लागेल.

आयकर विभागाच्या मते, 7 प्रकारचे आयटीआर फॉर्म आहेत. ITR-1, ITR-2, ITR-3, ITR-4, ITR-5, ITR-6, ITR-7. एखाद्या व्यक्तीने कोणता फॉर्म भरायचा हे उत्पन्न आणि त्याचे स्वरूप यावर अवलंबून असते.

VIEW ALL

Read Next Story